साताऱ्यात कोविड सेंटरवर बाऊंसरच्या उपस्थितीतच झाला राडा

साताऱ्यात कोविड सेंटरवर बाऊंसरच्या उपस्थितीतच झाला राडा
Scuffle in Satara Covid Centrer in Front of Bouncers

सातारा :  जिल्ह्यातील जम्बो कोविड सेंटर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडते आहे हे आज पर्यंत जिल्ह्यातील जनतेने पाहिलं आहे. रुग्णांना सेवा पुरवण्या पेक्षा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभार नेहमीच चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी च या व्यवस्थापनाने स्वतः साठी खाजगी सुरक्षा तैनात केली होती या वरून मोठा गदारोळ सुद्धा झाला होता. Scuffle in Satara Covid  Centrer in Front of Bouncers

परंतु, आता ही सुरक्षा असताना सुद्धा रात्री कोविड सेंटरच्या आवारात एका चारचाकी वाहनावर दगडफेक झाली. कर्मचाऱ्यांनी सुद्धा काम बंद आंदोलन केले. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार न दिल्याने त्यांनी काम बंद आंदोलन केले.

हे देखिल पहा

या कर्मचाऱ्यांबाबत व्यवस्थापनाने कोणतीच कागद पत्रांची पूर्तता केलेली नसून जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विमासुद्धा उतरवला नसल्याने आज संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा संतापाला सामोरे जावे लागल्याची चर्चा या परिसरात सुरू होती. 

साताऱ्यातील सामाजिक संस्थानी सुद्धा या ढिसाळ व्यवस्थापना विरोधात आवाज उठवून सुद्धा आजून पर्यंत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोणतीच ठोस भूमिका या बाबत न घेतल्याने सातारकर जनता तसेच येथील कर्मचारी वर्गाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. लाखो रुपयांचा चुराडा करून केवळ मनमानी करण्यासाठी उभे केलेले बाऊंसर आणि प्रशासनाच्या भाषेत खाजगी सुरक्षा व्यवस्था या वेळी काय करत होते ? हा सवाल आता सामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे. Scuffle in Satara Covid  Centrer in Front of Bouncers
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com