अभिमन्यू काळेंच्या बदलीवरुन आढळरावांचा आपल्याच सरकारवर ट्वीटर बाण

अभिमन्यू काळेंच्या बदलीवरुन आढळरावांचा आपल्याच सरकारवर ट्वीटर बाण
Shivajirao Adhalrao Supports Abhimanyu Kale

खेड : कोरोना Corona महामारीच्या संकट काळात रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या तुडवड्यावरुन राजकीय नेत्यांचा वादविवाद विकोपाला जात असताना अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे Abhimanyu Kale यांची बदली करण्यात आल्याने शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील Shivajirao Adhalrao सरकारच्याच निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहे  Shivajirao Adhalrao Upset over Transfer of Abhimanyu Kale

शिवाजीराव आढळरावांनी ट्विट करत म्हणतात...राज्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर फोडण्यात येऊन त्यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ आहे.अभिमन्यू काळे यांना मी अतिशय जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहीत नजरेसमोर ठेऊन त्यांनी नेहमीच आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे.

त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरे जावे लागले असून हे बाब अतिशय दुर्दैवी आहे.मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एक प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या केलेल्या तकडफडकी बदलीला माझा ठाम विरोध असून जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्यास माझा जाहीर पाठिंबा आहे...असेही आढळराव यांनी म्हटले आहे.

Edited By - Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com