अब्दुल सत्तारांचे पटोलेंना उत्तर; म्हणाले उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री

अब्दुल सत्तारांचे पटोलेंना उत्तर; म्हणाले उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री
Abdul Sattar - Nana Patole

जालना : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका, नगर परिषद निवडणुक काँग्रेस Congress स्वबळावर लढेल अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. यावर शिवसेनेचे Shivsena राज्यमंत्री अब्दुल सत्तार Abdul Sattar यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Shivena Leader Abdul Sattar Say Uddhav Thackeray will be Next CM 

हे देखिल पहा

काँग्रेसने निवडणूक कशी लढायची हा त्यांचा प्रश्न असून आमचीही  पालिका निवडणूक स्वबळावर लढायची तयारी सुरु असल्याचं सत्तार यांनी म्हटलंय. काँग्रेसला मुख्यमंत्री पद हवं असेल तर त्यांना सर्वाधिक जागा निवडून आणाव्या लागतील. मात्र भविष्यात देखील शिवसेनेच्याच सर्वात जास्त जागा निवडून येणार असून उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री असतील असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं.

जालन्यात आज शिवसेनेचा वर्धापन दिन आणि पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शिवसेनेच्या वतीने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कपाशी बियाणे आणि प्रत्येकी ७ हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या मदतीचं वाटप करण्यात आलं.या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. Shivena Leader Abdul Sattar Say Uddhav Thackeray will be Next CM 
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com