शरद पवारांनी फडणवीसांना नक्कीच मार्गदर्शन केलं असेल - राऊत

शरद पवारांनी फडणवीसांना नक्कीच मार्गदर्शन केलं असेल - राऊत
Sharad Pawar - Devendra Fadanavis - Sanjay Raut

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवरुन राजकीय चर्चा सुरु आहे. मात्र, शिवसेना Shivsena नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी या भेटीबाबत आज एक वक्तव्य केलं आहे. नक्कीच शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मार्गदर्शन केलं असेल, असं राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. Shivsena Leader Sanjay Raut Comment on Sharad Pawar Devendra Fadanaivs Meeting

हे देखिल पहा

ते म्हणाले, "शरद पवार हे देखील विरोधी पक्ष नेते होते आणि त्या काळात त्यांनी राज्याच्या विधिमंडळात चांगलं काम केलं आहे. ही एक सदिच्छा भेट असू शकते. त्यामुळे त्याकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे आहे. ज्या पद्धतीने विरोधी पक्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ निर्माण करतो आहे त्यामुळे पुढील शंभर वर्षे तरी महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही याबाबत शरद पवार यांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेल," विरोधी पक्षाचं सरकार राज्यात येणार नाही, असंही शरद पवारांनी फडणवीसांना सांगितलं असेल, असेही राऊत म्हणाले. Shivsena Leader Sanjay Raut Comment on Sharad Pawar Devendra Fadanaivs Meeting

दरम्यान, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून ही केवळ सदिच्छा भेट होती असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. पित्ताशयाच्या त्रासामुळे शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन पवार पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत. पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. 
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com