शिवसेना आमदार संतोष बांगर यांची तहसीलदारांना फोनवर शिवीगाळ

शिवसेना आमदार संतोष बांगर यांची तहसीलदारांना फोनवर शिवीगाळ
Santosh Bangar

हिंगोली : हिंगोलीच्या कळमनुरित शिवसेना आमदार संतोष बांगर व तहसीलदार मयूर खेंगले यांच्यात जप्त केलेल्या रेतीचे ट्रॅक्टर सोडून देण्याच्या कारणावरून वाद झाला आहे. आमदार संतोष बांगर यांनी पकडलेले ट्रॅक्टर तात्काळ सोडून द्यावेत, असे सांगत फोन करून अर्वाच भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप  तहसीलदार मयूर खेंगले यांनी केला आहे. Shivsena MLA in Hingoli Threatened Tehsildar over Sand Trucks

या प्रकरणी आमदार बांगर यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा उद्या पासून महसूल कर्मचारी अधिकारी लेखणी बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे, दरम्यान रेती परवाना असताना देखील तहसीलदारांनी ट्रॅक्टर पकडून पोलीस स्थानकात लावले असल्याने आपण केवळ ट्रॅक्टर सोडून द्यावे, अशी विनंती केल्याचे स्पष्टीकरण शिवसेना आमदारांनी दिले आहे.

हे देखिल पहा

हिंगोलीत कोरोना मृत्युंच्या चुकीच्या नोदी
हिंगोली जिल्ह्यात गेल्या दीड वर्षा पासून कोरोना रोगाने थैमान घातले आहे , जिल्ह्यात आज पर्यंत या रोगाची लागण झालेली रुग्ण संख्या १५०४९ वर गेली आहे तर मृत्यू संख्या ही ३२१ वर पोहचली आहे जिल्ह्यात आता बाधित रुग्णांची ॲक्टिव संख्या ही ५२९ असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. Shivsena MLA in Hingoli Threatened Tehsildar over Sand Trucks

मात्र असे असले तरी हिंगोली जिल्ह्याची रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी महाराष्ट्र शासनाच्या कोरोना पोर्टलवर चुकीची नोंदवल्या गेली आहे , जिल्ह्यात ३२१ मृत्यू झाले असताना पोर्टलवर मात्र केवळ २७३ तर जनांचीच नोंद झाली असून तब्बल ४८ जण या यादीतून गायब झाले आहेत, या प्रकाराने आरोग्य यंत्रणेत समन्वय नाही का असा सवाल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित केला आहे.
Edited By - Amit Golwalakr

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com