Breaking सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन जाहीर

Breaking सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन जाहीर
Sindhudurg Declared Red Zone

सिंधुदुर्ग : राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे तिथं आजपासून निर्बंधात शिथिलता दिली गेली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा आजपासून रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. Sindhudurg District Declared Red Zone due to Corona Increase

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खारेपाटण, करूळ, आंबोली, गोवा जिल्ह्यातील सीमा आजपासून बंद करण्यात आल्या आहेत. यापूर्वी जिल्हा बाहेरून किंवा परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीना प्रवेश दिला जात होता. मात्र आता प्रवेश आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. 

हे देखिल पहा

 तथापि एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर जिल्ह्यात येण्यासाठी ई- पास बंधनकारक करण्यात आला आहे. येत्या 1 जून ते 15 जून पर्यंत हा निर्णय लागू असणार आहे.Sindhudurg District Declared Red Zone due to Corona Increase

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात कोरोनाची आकडेवारी कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा वाढता आलेख कमी होताना दिसत आहे. परंतु, आता रुग्णसंख्या 15 हजारांवर आली आहे. महाराष्ट्रामध्ये लागू असलेले कडक निर्बंध कोरोनाची आकडेवारी कमी करण्यास उपयुक्त ठरत आहेत. रुग्णसंख्या कमी होत असली तरी राज्य सरकारने 15 जूनपर्यंत लॉकडाउन कायम ठेवलाआहे. मात्र राज्याच्या काही ठिकाणी शिथिलता देणार आली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 10 टक्के आहे तिथे शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी 20 टक्के आहे तिथे अगोदरचे निर्बंध कायम राहतील, असे सरकारने जाहीर केले आहे. राज्य सरकारने प्रवासाबाबतही काही निकष जारी केले आहेत. सदर प्रवास एखाद्या अशा प्रशासकीय घटकासाठी किंवा घटकातून होत असेल जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह दर आहे आणि ७५  टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरलेले आहेत, तेथे प्रवास करण्यासाठी परवानगी मिळणार नाही. Sindhudurg District Declared Red Zone due to Corona Increase

फक्त कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक आणीबाणीच्या प्रसंगी सेवा देणाऱ्या व्यक्तींना परवानगी देण्यात येणार. तसेच इतर ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांसाठी 12 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या आदेशाप्रमाणे निर्बंध /परवानगीच्या अटी-शर्ती लागू असतील. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. 

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com