आमदार अण्णा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थला अटक

आमदार अण्णा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थला अटक
Siddharth Bansode

पिंपरी : दोन खुनी हल्ले केल्या प्रकरणी फरार असलेलेल्या पिंपरी चिंचवड मधील आमदार पुत्राला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ बनसोडे त्याचं नाव आहे. तो पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा आहे. आज त्याला कोर्टा समोर हजर केलं जाणार आहे. Son Of Pimpri NCP MLA Anna Bansode Arrested

सिद्धार्थ  पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलगा आहे. 13 मे रोजी त्याच्या विरुद्ध पिंपरीतील एजी इन्व्हायरो इन्फ्रा या कंपनीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी तसेच आमदाराला बोलण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीलाही जबर मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटनाही याच दरम्यान घडली होती.

हे देखिल पहा

आपली दोन माणसं कामावर घेण्यावरून आमदार बनसोडे यांचं एजी एन्व्हायरो कंपनीचा मॅनेजर तानाजी पवार यांच्या सोबत  बोलणं सुरू होतं. मात्र बोलण्याचा रूपांतर वादात झालं तेव्हा बनसोडेचा मुलगा तानाजी पवारला शोधण्यासाठी कंपनीत दाखल झाला. मात्र तिथे पवार न मिळाल्याने त्याने इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा तक्रार कंपनीकडून दाखल करण्यात आली होती. Son Of Pimpri NCP MLA Anna Bansode Arrested

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी तानाजी पवार आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात गेला होता. मात्र तिथे दोघांमध्ये वाद झाले आणि एजी इन्व्हायरो कंपनीचा मॅनेजर असलेल्या तानाजी पवारने आमदार बनसोडेवर गोळ्या झाडल्या. Son Of Pimpri NCP MLA Anna Bansode Arrested

याच घटने दरम्यान उपस्थित असलेल्या सिद्धार्थ आणि त्याच्या कार्यकर्त्यांने  तानाजी पवारला बेदम मारहाण केल्याची तक्रारही करण्यात आली होती. या दोन्ही प्रकणात  सिद्धार्थ व त्याच्या कार्यकर्त्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाल्या नंतर सिद्धार्थ फरार झाला होता. मात्र अखेर काल निगडी पोलिसांनी त्याला शोधलं व  सिद्धार्थच्या चार साथीदारासह त्याला रत्नागरीतून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त इप्पक मंचर यांनी दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com