अर्थसंकल्पात रेल्वे आणि रस्त्यांसाठी भरीव तरतूद, वाचा कसं असेल नियोजन?

अर्थसंकल्पात रेल्वे आणि रस्त्यांसाठी भरीव तरतूद, वाचा कसं असेल नियोजन?

यंदाच्या बजेटमध्ये रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आलीय याशिवाय नाशिक आणि नागपूरच्या मेट्रोसाठी विशेष तरतूद करण्यात आलीय. मुंबई ते कन्याकुमारी हा केंद्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणारंय. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पायाभूत सुविधांसाठी नेमकं काय दिलंय. 

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे, मेट्रो, रस्ते या पायाभूत सुविधांसाठी काय काय मिळणार याकड़ेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वेसाठी केंद्रानं भरीव तरतूद केलीय. 

रेल्वेसाठी बजेटमध्ये काय ?

रेल्वेच्या सेवा सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1.7 लाख कोटींची तरतूद केलीय. यात नॅशनल रेल्वे प्लॅननुसार 2030 पर्यंत विकास केला जाणारय. 

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लागू केलेल्या कठोर टाळेबंदीचा फटका रेल्वे सेवेला बसला. रेल्वेची लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक ठप्प असली तरी माल वाहतुकीतून रेल्वेला तारलं. गेल्या सहा महिन्यात देशांतर्गत माल वाहतुकीतून रेल्वेनं बऱ्यापैकी कमाई केली. मात्र रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण, दुहेरी आणि चौपदरीकरण, गेल्या अर्थसंकल्पात घोषीत करण्यात आलेली पायाभूत सुविधांच्या विकासाची कामं पूर्ण कारण्यासाठी हा निधी वापरण्यात येणारय.

यंदाच्या बजेटमधून नागपूर आणि नाशिककरांना मोठा दिलासा मिळालाय. या दोन्ही शहरातील मेट्रो प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं मोठा निधी देऊ केलाय. 

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5976 कोटींची तरतूद करण्यात आलीय  तर नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटींची घोषणा करण्यात आलीय. 

रस्ते वाहतुकीसाठी बजेटमध्ये काय ? 

रेल्वे आणि मेट्रोसोबत रस्ते वाहतुकीवर बजेटमध्ये भर देण्यात आलाय. यंदाच्या बजेटमध्ये रस्ते विकास कामांसाठी 1 लाख 18 हजार 101 लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलीय. यात सर्वाधित तरतूद ही पश्चिम बंगालमधील रस्त्यांसाठी आहे. पश्चिम बंगालमधील रस्त्यांसाठी 25 हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. याशिवाय मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांसाठी 40 हजार कोटींचा भरीव निधी देण्यात आलाय. 

पायाभूत सुविधांवरच्या या तरतुदींचं अनेकांनी स्वागत केलंय. विरोधकांनी मात्र हे आकडे फसवे असल्याचं म्हंटलंय. शिवाय निवडणुका असल्यामुळे पश्चिम बंगालमधील रस्त्यांसाठी जास्तीचा निधी देऊ केल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय. 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com