खडसेंमुळे राष्ट्रवादीतल्या या मंत्र्यांची पदं जाण्याची शक्यता, वाचा कसं असेल नियोजन?

खडसेंमुळे राष्ट्रवादीतल्या या मंत्र्यांची पदं जाण्याची शक्यता, वाचा कसं असेल नियोजन?

भाजपला सोडचिठ्ठी देऊन, मनगटावर घड्याळ बांधणाऱ्या एकनाथ खडसेंमुळे राष्ट्रवादीतल्या कोण्या एका मंत्र्यांची वेळ बिघडलीय. खडसेंसारख्या जनाधार असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेत्याला मंत्री करण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं असून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड किंवा कामगार मंत्री दिलीप वळसे यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे यांना जयंत पाटील यांच्याकडील जलसंधारण खाते मिळण्याची शक्यताय. तर  जयंत पाटील यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्याकडे असलेल्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची चर्चाय. तर धनंजय मुंडे यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यताय.

हेही वाचा -

दरम्यान,  पक्षनेतृत्वावर नाराज नाही. माझी नाराजी ही फक्त देवेंद्र फडणवीसांवर आहे, असं म्हणत एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. कुणाचीही तक्रार नसताना माझी नाहक बदनामी करण्यात आली असंही खडसे यांनी म्हटलंय. तर 'नाथाभाऊ सांगतायत ते अर्धसत्य आहे,' अशा शब्दांत फडणवीसांनी एकनाथ खडसेंच्या आरोपांना उत्तर दिलंय. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याबाबत विचारलं असता, खडसेंचा राजीनामा दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ज्या केसच्या आधारे खडसे आरोप करतायत, ती केस काय आहे ते सर्वांना माहित असल्याचंही फडणवीस म्हणालेत. शिवाय कुणाच्या जाण्याने किंवा येण्याने फारसा फरक पडत नसतो, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

पाहा यासंदर्भातील सविस्तर व्हिडिओ -

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com