तपासाच्या नावाखाली वाझेंनी पुरावे नष्ट केले? गोळा कलेले पुरावे गायब केल्याचा संशय...

तपासाच्या नावाखाली वाझेंनी पुरावे नष्ट केले? गोळा कलेले पुरावे गायब केल्याचा संशय...

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झालीये. या प्रकरणाचा तपास NIA  करतयं. वाझेंवर पुरावे नष्ठ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अँटेलियाबाहेरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे आरोपी आहेत. तर मनसुख हिरेन प्रकरणात ते संशयित आहेत. पण याच प्रकरणात सचिन वाझे आणि पोलिसांच्या CIUनं तपास केला. त्यामुळं त्यांनी अनेक पुरावे गायब केल्याचा संशय आहे. ठाण्यातील दुकानदाराची डायरी, रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही डीव्हीआर सीआययूनं नेला पण त्याची नोंद गुन्हे शाखेच्या रेकॉर्ड़्सवर नाही.

सचिन वाझे ठाण्यातील ज्या साकेत सोसायटीत राहातात त्या सोसायटीच्या सीसीटीव्हीचे डीव्हीआरही सीआययूच्या अधिकाऱ्यांनी नेलेत. हे पुरावे त्यांच्याकडं असतील का याबाबत एनआयए साशंक आहे. एनआयए आता सीआययू पथकाकडून माहिती गोळा करण्याच्या कामाला लागलीय.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केले. या प्रकरणाचा तपास NIA  करतयं, या प्रकरणी वाझेंच्या वर पुरावे नष्ठ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात काही तथ्य आणि पुरावे समोर आले आहेत.

अँन्टीलिया येथील  उद्योगपती  मुकेश अंबानी  यांच्या घरा शेजारी सापडलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणी तपासाच्या नावाखाली CIU  पथकाने ठाण्यातील एका दुकानदाराची डायरी, रेकॉर्डस, सीसीटीव्हा फुटेज जप्त केले होते. माञ त्या वस्तू गुन्हे शाखेच्या रेकॉर्डवर नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.  विशेष म्हणजे  CIU च्या पथकाने वाझे रहात असलेल्या सोसायटीमध्येही पञ व्यवहार करूनही सोसायटी परिसरातले CCTV ताब्यात घेतले. माञ ते का ? हे अद्याप कळू शकले नाही. त्यामुळे वाझेंनी पुरावे तर नष्ठ करायच्या हेतून तर  हे रेकाँर्डवर जाणून बुजून घेतलं नाही.

वाझे रहात असलेल्या सोसायटीचे डिव्हीआर वाझेंच्या पथकातील म्हणजे CIU च्या अधिकाऱ्यांनी २७ फेब्रुवारीला हस्तगत केले. तर सदगुरू कार डेकोरेटरच्या दुकानातून बनावट नंबर प्लेट बनवल्या असल्याने तपासाच्या नावाखाली त्या दुकानातील CCTV चा डिव्हीआर देखील CIU ने हस्तगत केलं आहे. याचा दुजोरा दुकानाच्या मालकाने दिला आहे

या प्रकरणाचा तपास NIA कडून जलदगतीने होतं आहे. या प्रकरणी NIA राञी उशिरा मुंबई पोलिस आयुक्तालयातील CIU  विभागात झाडाझडती केली.पुराव्याच्या अनुशंगाने करण्यात आली असल्याची माहिती सूञांनी दिली आहे. ही कारवाई सुरू असताना मुंबई पोलिस दलातले बडे अधिकरीही
 उपस्थित होते. आता या प्रकरणात नवीन काय खुलासे होतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे..

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com