पश्चिम बंगालमध्ये तृणमूल पुन्हा गड राखणार?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल पुन्हा गड राखणार?
Mamata Banerjee - Narendra Modi

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या कलांनुसार सध्यातरी ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस TMC आघाडीवर आहे. भाजप BJP दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या कलांनुसार तृणमूल ८६ जागांवर तर भाजप ७२ जागांवर आघाडीवर आहे. West Bengal Election Counting Started

पश्चिम बंगाल, तमिळनाडू Tamilnadu, केरळ Kerala, आसाम Assam पुदुच्चेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता निकालाची प्रतिक्षा लागली आहे. आज पाचही राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. तत्पुर्वी अनेक एक्झिट पोलचे कल काँग्रेससाठी फारसे आशादायक नाहीत. बंगालमध्ये काँग्रेस Congress मागील विधानसभेच्या जागाही राखता येणार नाहीत. तर केरळ व आसाममध्ये सत्ता मिळवण्यासाठी केलेला जोरदार प्रचारही कामी येणार नाही, असे दिसते. 

एनडीटीव्ही'ने सर्व एक्झिट पोलची Exit Polls सरासरी काढून व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल १४९  जागा मिळवून ममता बॅनर्जी सत्ता ताब्यात ठेवतील. भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊन पक्षाला ११६ जागा मिळतील असाही अंदाज आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला १६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. West Bengal Election Counting Started

निवडणुकीआधी जाहीर झालेल्या टाईम्स नाऊ-सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार (जनमत चाचणी) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस राज्यातील सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवेल. भाजपने तृणमूलमधील अनेक नेत्यांना फोडून पक्षाला खिंडार पाडले होते. याचा फायदा काही प्रमाणात भाजपला होईल, असे बोलले जाते. राज्यात भाजपच्या जागा वाढतील. मात्र, सत्तेपासून भाजप दूरच राहील. तृणमूलच्या जागांमध्ये घट होण्याचा अंदाज आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तृणमूलला एकूण २९४ जागांपैकी २११ जागा मिळाल्या होत्या. या वेळी तृणमूलला १५४ जागा मिळून बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजपला मागील निवडणुकीत केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. या वेळी भाजपला १०७ मिळतील, असा अंदाज आहे. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com