राज्याच्या अर्थसंकल्पात महामंबईसाठी काय?

राज्याच्या अर्थसंकल्पात महामंबईसाठी काय?

राज्याच्या बजेटमध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईसाठी महत्वाच्या घोषणा आणि तरतूद केली आहे. मुंबईतल्या मेट्रोला गती देणे, ठाण्यात वर्तुळाकार मेट्रोचा प्रकल्प, शीळफाटा उड्डाणपुलाची निर्मिती अशा अनेक योजनांचा यात समावेश आहे.एक नजर टाकूया राज्याची राजधानी मुंबईसाठी अर्थसंकल्पात काय आहे ते.

अर्थसंकल्पात महामुंबईसाठी काय?

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी.अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महा मुंबईसाठी काय आहे तुम्हीत वाचा.


वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे 17.17 किलोमिटरचे 11 हजार ३३३ कोटी रुपये खर्चाचे काम करण्यात येणार आहे, वांद्रे-वर्सोवा-विरार सागरी सेतूचे ४२ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु झाले आहे, गोरेगाव-मुलुंड-लिंकरोडचे ६ हजार ६०० कोटी रुपयांचे निविदाविषयक काम सुरु झाले आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून २०२४ पर्यंत तो पूर्ण होणार आहे. वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडूप, वर्सोवा आणि मालाड येथे १९  हजार ५०० कोटी रुपयांचे  सांडपाणी प्रक्रिया उभे राहणार आहेत. मिठी, दहिसर,पोईसर आणि ओशिवरा नद्यांचे पुनरुज्ज्वीवन करण्याचे काम सुरु आहे. १४ मेट्रो लाईनसाठी १ लाख १४ हजार कोटींचा निधीची तरतूद आहे,  मेट्रो-२-अ, मेट्रो-७ २०२१ पर्यंत पूर्ण करणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. ठाण्यात ७५०० कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे, वरळी-शिवडी सागरी सेतू पुर्ण होणार असून, विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरचे काम सुरु झाले आहे, ठाणे कोस्टल रोडचीही घोषणा करण्यात आली आहे, मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवण्यात येणार आहे, वसई ते कल्याण जलमार्गाचाही घोषणा करण्यात आली आहे,  कोलशेत, काल्हे, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभारली जाणार आहे, मुंबईत रेल्वे रुळांवरील ७ उड्ढाणपूल बांधले जाणार आहेत, शीळफाटा उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार आहे तसेच  मुंबईत सायकलींसाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यात येणार आहेत या शिवाय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ईस्टर्न फ्रीवेला विलासराव देशमुख यांचे नाव दिले जाणार आहे.
महामुंबईसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याचा राज्य सरकारचा इरादा असला तरी कोरोनामुळं राज्याची स्थिती बिकट झाली आहे याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही, केंद्राकडून जीएसटीचा परतावा अद्याप मिळालेला नाही याकडेही अर्थमंत्री अजित पवारांनी लक्ष वेधले आहे. आर्थिक परिस्थिती सुधारली तरच आणि महामुंबईसाठीचे विविध प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com