चिंताजनक! ब्रिटनमधून आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह, सर्वांची चिंता वाढली...

चिंताजनक! ब्रिटनमधून आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह, सर्वांची चिंता वाढली...

नागपूर : इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला नागपूरमधील एक तरुण कोरोनाबधित आढळला आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची अनेकांना लागण झाली आहे. त्यामुळे इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा तरुण कोरोनाच्या नवीन प्रकाराने बाधित असू शकतो, या शक्यतेने काळजी घेतली जात आहे.

कोरोनाचा हा नवीन विषाणू 'आऊट ऑफ कंट्रोल" आहे, असे ब्रिटनमधील संसदेत तिथल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. युरोपमधील इतर देशांनी सतर्कता दाखवत इंग्लंडमधून येणाऱ्या सर्व हवाई वाहतुकीवर व बोटींद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. याआधी आलेल्या कोरोना विषाणूवेळी आपल्या देशात उशीरा सतर्कता दाखविल्यामुळे व लॉकडाऊनच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे मोठी जीवितहानी झाली होती.

या कोरोना संशयितामुळे प्रशासन चिंतेत पडले आहे. संबंधित रुण्य तरुणावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु असून त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील 'एनआयव्ही' प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हा तरुण इंग्लंडमधून आल्यानंतर नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात आला होता. या तरुणाच्या संपर्कात आलले कुटुंबातील काही सदस्य व अन्य काही जण कोरोना बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अनेक देशांत हाहाकार झाला होता. अनेक जणांनी प्राण गमावले होते. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरात सगळ्याच देशांनी पूर्ण लॉकडाऊन केले होते. जनजागृतीतून जग सावरत असतानाच व कोरोनावरील लस आता अंतिम टप्प्यात असताना इंग्लंड मधील कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगभर भीतीचे वातावरण पसरले आहे. 

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात आता २२ डिसेंबरपासून  महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ती लागू राहील.

त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com