स्टेट बँकेने केली कर्जांवरील व्याजदरात कपात

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 8 मे 2020

कर्जाची मागणी वाढून आर्थिक व्यवहारांना गती यावी या उद्देशाने या बँकेने आपल्या एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेण्डिंग रेट्स) आधारित कर्जाच्या व्याजदरात ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देऊन मुदत ठेवींवर वाढीव व्याज देणारी विशेष योजना दाखल केली आहे. या ठेव योजनेचा कालावधी पाच वर्षे वा त्याहून अधिक असून त्यावर ०.३० टक्के अधिक दराने व्याज मिळेल.टाळेबंदीमुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 

स्टेट बँकेने गेल्या वर्षभरापेक्षा अधिक कालावधीत वेळोवेळी कर्जांवरील व्याजदरात कपात केली आहे. देशांतर्गत मागणीस चालना देण्यासाठी या बँकेने आतापर्यंत सलग अकरा वेळा व्याजदरात कपात केली होती. हे सत्र कायम राखून स्टेट बँकेने शुक्रवारी बाराव्यांदा दरकपात केली. यामुळे आतापर्यंत ७.४ टक्क्यांवर असणारा एमसीएलआर आधारित कर्ज व्याजदर ७.२५ टक्क्यांपर्यंत घटला आहे. यामुळे गृहकर्जदारांची बचत होणार आहे. ३० लाख रुपयांचे व २५ वर्षे मुदतीच्या गृहकर्जाचा मासिक हप्ता या कपातीनंतर २५५ रुपयांनी कमी होणार आहे.

कर्जाची मागणी वाढून आर्थिक व्यवहारांना गती यावी या उद्देशाने या बँकेने आपल्या एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेण्डिंग रेट्स) आधारित कर्जाच्या व्याजदरात ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देऊन मुदत ठेवींवर वाढीव व्याज देणारी विशेष योजना दाखल केली आहे. या ठेव योजनेचा कालावधी पाच वर्षे वा त्याहून अधिक असून त्यावर ०.३० टक्के अधिक दराने व्याज मिळेल.टाळेबंदीमुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 

आपण स्टेट बँकेकडून ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. अशा परिस्थितीत १५ बेसिस पॉइंट्सच्या कपातीमुळे एक लाख रुपयांच्या कर्जावरील हप्त्यामध्ये १५० रुपयांची कपात होणार आहे. या हिशेबाने ३० लाख रुपयांच्या एकूण कर्जावरील व्याजात ४५०० रुपयांची बचत होणार आहे. एका वर्षाच्या व्याजात ४५०० रुपयांची बचत म्हणजे एका महिन्याच्या व्याजातील ३७५ रुपये वाचणार आहेत. 

५ वर्षे वा त्याहून अधिक कालावधीच्या मुदतीसाठी सध्याच्या तुलनेत ०.३० टक्के अधिक दराने व्याज मिळेल. या योजनेत ३० सप्टेंबरपर्यंत सहभागी होता येईल. ३ वर्षांपर्यंतच्या सर्वसाधारण मुदत ठेवींवरील व्याजदरात मात्र ०.२० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
 सर्वच बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीवर गदा आली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत स्टेट बँकेने एसबीआय वुई केअर डिपॉझिट ही विशेष योजना दाखल केली आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्र व इंडियन ओव्हरसीज बँक या अन्य दोन सरकारी बँकांनीही एमसीएलआर आधारित कर्जांवरील व्याजदरात कपात घोषित केली आहे. महाराष्ट्र बँकेने एक वर्ष मुदतीच्या कर्जांवरील व्याजदर ०.१० टक्क्यांनी कमी केला असून, या मुदतीचे कर्ज आता ७.९ टक्के दराने मिळेल.  
 बँकेने एक दिवस ते सहा महिने कालावधीच्या कर्जांवरील व्याजदर ७.७ टक्क्यांवरून ७.४ टक्क्यांवर आणला आहे. ही कपात तातडीने लागू करण्यात आली आहे. ओव्हरसीज बँकेने एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात ०.१० टक्क्याने कपात केली असून हा व्याजदर आता ८.१५ टक्क्यांवर आला आहे. या बँकेने तीन महिने ते तीन वर्षे मुदतीच्या कर्जांवरील व्याजदरात .०५ ते .१० टक्के कपात केली आहे. नवे व्याजदर १० मेपासून लागू होतील.

WebTittle :: SBI cuts interest rates on loans

संबंधित बातम्या

Saam TV Live