चिदंबरम यांना झटका

चिदंबरम यांना झटका

 आजच चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने सुनावणीस नकार दिल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली होयकोर्टाने यापूर्वी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होताINX media प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सुप्रीम कोर्टाने आज (सोमवार) नकार दिला. त्यामुळे चिदंबरम यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

INX media भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे. त्यामुळे सीबीआयनंतर आता ईडी देखील चौकशीसाठी चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई करु शकते. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, जर कोणत्याही तपास यंत्रणेने कोणत्याही आरोपांविरोधात चौकशीसाठी कोणाला अटक केली असेल तर त्याची अटकपूर्व जामीन याचिका आपोआपच निष्प्रभ्र होऊन जाते. जर आपल्याला जामीन हवा असेल तर त्यासाठी योग्य त्या कोर्टात जावं, असा सल्लाही कोर्टाने चिदंबरम यांच्या वकिलांना दिला.
Web Title: Sc Dismisses Appeal Filed By Congress Leader P Chidambaram In Inx Media Case 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com