पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द, पण दहावीची परीक्षा ठरल्याप्रमाणे होणारच!

राजू सोनावणे
शुक्रवार, 20 मार्च 2020

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षकांनाही दिलासा मिळालाय.

मुंबई -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय..शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली घोषणा केलीय. तर 9 वी आणि ११ वीच्या परिक्षेचा निर्णय १५ एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

 

१०वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच  होणार. दोनच पेपर बाकी असल्यामुळे दहावीच्या परीक्षा सुरुच राहणार आहेत. मात्र पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसांत सर्वच शाळांच्या वार्षिक परीक्षा सुरु केल्या जातात. मात्र यंदा संपूर्ण देशावर कोरोनाचं सावट आहे. महाराष्ट्रातली परिस्थितीही चिंताजनक आहे. त्यामुळे खबरादारी म्हणून हा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षकांनाही दिलासा मिळालाय. शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या होत्या. मात्र आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. 

 

TWEET - 

 

 

 

पाहा व्हिडीओ - 

school exam cancelled due to corona covid 19 in maharashtra marathi


संबंधित बातम्या

Saam TV Live