राज्यातल्या शाळा 15 जूनपासून सुरू होणार? 

साम टीव्ही
मंगळवार, 2 जून 2020
  • राज्यातल्या शाळा १५ जूनपासून सुरू होणार ? 
  • सोशल मीडियावरच्या जीआरमुळे पालकांमध्ये संभ्रम 
  • काय आहे व्हायरल जीआरचं सत्य ? 

औरंगाबाद : राज्यातल्या शाळा १५ जून पासून सुरू करण्याचे सरकारचे आदेश असल्याचा एक जीआर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतोय. मात्र, हा जीआर खरा आहे की खोटा.

गेल्या काही दिवसांपासून व्हॉटस ऍप आणि इतर सोशल माध्यमांवर हा जीआर व्हायरल होतोय. १५ जून पासून राज्यातल्या शाळा सुरू होतील आणि तशा सूचना संबंधित शाळांना देण्यात आल्या आहेत, अशा आशयाचा मेसेज या जीआरमधून व्हायरल केला जातोय. या मेसेजमुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. हा जीआर खरा आहे की खोटा, असा प्रश्न अनेकांना पडलाय.

या जीआरची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आमच्या टीमनं संबंधित शाळा आणि शिक्षकांकडे विचारणा केली. 

शाळा १५ तारखेपासून सुरु करण्यासंदर्भात सरकारनं असा कोणताही जीआर काढला नसल्याचं शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. हा जीआर खोटा असून शाळा सुरू करण्याची घाई सरकार करणार नाही, असंही सांगण्यात आलंय. त्यामुळे अशा मेसेजवर कुणीही विश्वास ठेवू नये, असंही आवाहन करण्यात आलंय. मार्चपासून राज्यातल्या शाळा बंद आहेत. सरासरी गुणांच्या आधारावर निकाल लावून पुढच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. मात्र कोणीतरी खासगी शाळा आणि संस्थाचालकांनी आपले खिसे भरण्यासाठीच अशा स्वरुपाचा खोटा मेसेज व्हायरल केला असावा, असंही बोललं जातंय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live