सेकंड लॉकडाउन मध्ये, मार्डी येथे सर्रास बनावट दारू विक्री...

Illicit Liquor
Illicit Liquor

यवतमाळ : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर  "ब्रेक द चेन" या सेकंद लॉकडाऊन Lockdown मध्ये यवतमाळ Yavatmal जिल्हात दारू विक्री बंदचा आदेश आहे. असं असताना देखील मारेगाव तालुक्यातील मार्डी Mardi येथे खुले आम बनावट दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना Police मिळाली आहे.  In the second lockdown counterfeit liquor sales at Mardi 

मार्डी येथील एका देशी- विदेशी दारू दुकानावर धाड टाकून  ४३ लाखाच्या वर  देशी अवैध  विदेशी दारू जप्त करून ६ आरोपींना अटक केले आहे. कारवाई दरम्यान जयस्वाल यांचे दारू दुकानावर धाड टाकुन दारू विक्री करताना रंगेहात  पकडले आहे.

यात देशी दारू आणि  विदेशीच्या जवळपास ८००  पेट्या मुद्देमाल जप्त केला आहे. या शिवाय बनावट दारू बनविण्यासाठी लागणारे स्पिरीट तत्सम पदार्थ , रासायनिक रंग तसेच पॅकिंगची साधने असे आढळून आले आहे . "ब्रेक द चेन" या काळात शासनाची परवानगी असलेले मद्याची दुकाने बंद असल्याने असली बनावट दारू निर्मिती विक्री करणाऱ्याचे चांगलेच फावले आहे. शिवाय यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडतो. नागरिकांच्या प्रकृतीला सुद्धा अपाय होऊ शकतो .यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या  पथकाने केल्याने एव्हड्या मोठ्या कारवाईने दारू तस्करी वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

Edited By- Digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com