कोरोना लशींचा राज्यात तुटवडा, कच्च्या मालाच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता

साम टीव्ही
बुधवार, 10 मार्च 2021

कोरोना लशीचा भासू शकतो तुटवडा
सीरमचं केंद्र सरकारला पत्र
कच्च्या मालाच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता

 

कोरोनावरील लस उपलब्ध झाल्याने काहीसा दिलासा मिळालेला असतानाच कोरोनावरील लशीचा तूटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. खुद्द सीरम इन्स्टिट्यूटनेच ही भीती व्यक्त केलीय.

भारतात सध्या कोरोनच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झालाय. मात्र लसीकरणाची ही मोहीम ऐन भरात असताना कोव्हीशील्ड या लशीचा तुटवडा भासू शकतो अशी भीती खुद्द सीरम इन्स्टिट्यूटने व्यक्त केलीय. त्याबाबत केंद्र सरकारला त्यांनी पत्रही लिहिलंय.

कोव्हिशील्ड ही लस पुण्यातल्या सीरममध्ये बनवली जाते. मात्र त्यासाठीचा कच्चा माल अमेरिकेतून आयात केला जातो. सध्या अमेरिकेत आयात निर्यातीबाबत नवीन कायदा लागू करण्यात आलाय. अमेरिकेकडून आवश्यक उत्पादनं वेळेत न मिळाल्यास लसनिर्मितीवर त्याचा परिणाम होणारेय. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटने भारत सरकारला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केलीय.आता या प्रकरणी केंद्र सरकार काय पावलं उचलणार ते पाहणं महत्वाचं असेल. 
.


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live