आंब्यांच्या राजालाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका! (पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
रविवार, 18 एप्रिल 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हापूस आंब्याला ही फटका बसला आहे. निर्बंधांमुळे वाहतूक ठप्प झाल्याने आंब्याची आवक निम्म्याने घटली आहे. पाच डझनच्या एका पेटीसाठी तब्बल चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यानं भाव गगनाला जाऊन पोहोचले आहेत.

मुंबई:  कोरोनाच्या Corona  दुसऱ्या लाटेचा हापूस आंब्याला ही फटका बसला आहे. निर्बंधांमुळे Restrictions वाहतूक ठप्प झाल्याने आंब्याची Mango आवक निम्म्याने घटली आहे. पाच डझनच्या एका पेटीसाठी तब्बल चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यानं भाव गगनाला जाऊन पोहोचले आहेत. कोरोना, अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदा हापूस आंब्याची आवक तब्बल ५० टक्क्यांनी घटली आहे. The second wave of corona also hit the Alphonso Mango 

खरेदीसाठी येणाऱ्या गिऱ्हाईकाला कमी किमतीत म्हणजेच ५०० ते ६०० रुपये डझन या दराने आंबे हवे असतात. परंतु आता आंब्याचे भाव १००० रुपयांचं वर पडत असल्याने  गिऱ्हाईक आंबे खरेदीसाठी मागे फिरत आहेत. दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारीपासून देशातील विविध ठिकाणाहून वेगवेगळ्या जातींचे आंबे बाजारात विकण्यासाठी यायला लागतात. सुरुवातीला कोकणातील Kokan हापूस आंब्याचा प्रमाण अत्यल्प असते, मात्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून हापूसची आवक वाढल्याने आंब्याचे दर कमी होतात. 

यंदा मात्र कोरोनामुळे वाहतूक थंडावल्याने आंब्याचे दर वाढलेत. सद्य नवी मुंबईत Navi Mumbai बाजार समितीत देवगड हापूस Devgad Alphonso आंब्याच्या पाच डझनाच्या पेटीला चार हजार रुपयांचा दर आहे. तर रत्नागिरी हापूसला Ratnagiri Alphonso तीन ते साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळत आहे.

कर्नाटक हापूस Karnatak Alphonso एकशे सत्तर ते दोनशे रुपये किलोने विकला जात आहे. याशिवाय तोतापुरी आंब्याची पन्नास ते साठ रुपये किलो दराने विक्री चालू आहे. बदाम जातीच्या आंब्याला साठ ते सत्तर रुपये किलो असा दर मिळत आहे. सध्या मुंबईतील APMC मार्केट मध्ये एक पेटीला पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी मोट्या प्रमाणात आंबे खरेदीसाठी या मार्केट कडे पाठ फिरवलेली दिसून येत आहेत. 

Edited By- Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live