जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान, युरोपातील अनेक देश पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत

साम टीव्ही
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020
  • जर्मनीनं तर महिन्याभरासाठी रेस्टॉरंट आणि बार बंद करण्याचे आदेश जारी केलेत.
  • फ्रान्समध्ये एकाच दिवसात 50 हजारांहून अधिक रुग्ण मिळाल्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलंय. युरोपातील अनेक देश पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत. वाचा कसा आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळतोय. युरोपात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. स्थिती इतकी नियंत्रणाबाहेर गेलीय की ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्ससह अनेक युरोपियन देश पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत. 

  • जर्मनीनं तर महिन्याभरासाठी रेस्टॉरंट आणि बार बंद करण्याचे आदेश जारी केलेत.
  • फ्रान्समध्ये एकाच दिवसात 50 हजारांहून अधिक रुग्ण मिळाल्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय.
  • युरोपमध्ये आठवड्याभरात 37% नवीन कोरोना रुग्णांची वाढ झालीय. 
  • आठवड्याभरात युरोपात 13 लाख नवीन रुग्ण सापडलेतय
  • थंडीत कोरोना संक्रमण भयानक रुप घेऊ शकतं, असा इशारा संशोधकांनी यापूर्वीच दिला होता. त्याचंच भयानक रुप आता युरोपात दिसू लागलंय. अर्थात युरोपकडून धडा घेऊन भारतानं वेळीच सावध होणं आवश्यक आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live