कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सापडले मंत्री मंत्र्यांना बाधा

साम टीव्ही
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

कोरोनाचा दुसऱ्यांदा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना थेट मंत्रालयात शिरलाय. राज्य मंत्रिमंडळातल्या चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झालीय . 

राज्याच्या मंत्रिमंडळाला कोरोनाची बाधा झालीय. गेल्या ४८ तासांत राज्याच्या ४ मंत्र्यांना कोरोना झालाय. तर एकनाथ खडसेंनाही दोनदा कोरोनाची लागण झालीय. कोरोनापासून मंत्रीही स्वतःला वाचवू शकले नाहीत.

कोरोनाचा दुसऱ्यांदा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना थेट मंत्रालयात शिरलाय. राज्य मंत्रिमंडळातल्या चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झालीय.  राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झालीय. याशिवाय माजी मंत्री एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झालीय.  

कोरोना झालेल्या मंत्र्यांमध्ये चार राष्ट्रवादीचे मंत्री आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचा जनता दरबार दोन आठवड्यासाठी पुढं ढकलण्यात आलाय. कोरोनामुळं मंत्र्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात जाताना काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.

 अधिवेशन काही दिवसांवर येऊन ठेपलंय. त्याच्या तोंडावर चार मंत्र्यांना कोरोना झालाय. त्यामुळं येत्या काळात उर्वरित मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी स्वतःची काळजी घेण्याची गरज निर्माण झालीय.


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live