पुणे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषण दाहकता !.. पहा व्हिडिओ

सागर आव्हाड
रविवार, 18 एप्रिल 2021

पुणे शहर आणि जिल्यामध्ये कोरोनामुळे मृत्य झालेल्यांची आकडेवारी पाहता कोरोनाची दुसरी लाटअधिक भयंकर आणि घातक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना मृतांवर सरणावरच अंत्यसंस्कार करण्याचा महापालिकेनं निर्णय घेतलेला आहे. 

पुणे: पुणे Pune शहर आणि जिल्यामध्ये कोरोनामुळे Corona मृत्य झालेल्यांची आकडेवारी पाहता कोरोनाची दुसरी लाट Second Wave अधिक भयंकर आणि घातक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आतापासून कोरोना मृतांवर सरणावरच अंत्यसंस्कार Funeral करण्याचा महापालिकेनं PMC निर्णय घेतलेला आहे.   पुणे शहरात दिवसाला  सरासरी ७५ कोरोना बाधित लोकांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे पुण्यातील स्मशानभूमी सुद्धा आता फुल्ल झालेले आहेत. The second wave of corona is more dangerous in Pune city

सतत वाढत असलेल्या कोरोना मृत्यदरामुळे विद्युत दाहिन्यांवर प्रचंड ताण येत आहे. यामुळे मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारांसाठी Funeral तब्बल तीस-तीस तास वाट पाहावी लागत आहे.  एक मृताचे अंत्यसंस्कार पूर्ण होण्यासाठी एक तास वेळ लागतो आहे. विद्युत दाहिनीसाठी मृतदेह वेटिंग वर राहत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

अत्यंत विदारक अशी परिस्थिती पुण्यामध्ये बघायला मिळत आहे. पुण्यात मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मृतदेहांच्या दहनासाठी जागा न मिळणे अशी भयानक परिस्थिती पुण्यामध्ये बघायला मिळत आहे. आठ ते नऊ तास अंत्यसंस्कार करण्यासाठी थांबावे लागत आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी   करण्याचा मार्ग महानगरपालिकेने आता स्वीकारलेला आहे.  त्यामुळे पुण्यातील स्मशानभूमी किंवा विद्यतदाहिनी असेल यामध्ये वेटिंग करावे लागत आहे. हे सर्व भयानक परिस्थिती पाहून अंगावर काटा आणणारे दृश्य पाहायला मिळते आहे. अशी हृदयद्रावक परिस्तिथी पुण्यावर ओढवलेली आहे. त्यामुळे लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live