राज्यात कोरोनाची दुसरी लाट? दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने आरोग्य यंत्रणा सतर्क

साम टीव्ही
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

राज्यात कोरोनाची दुसरी लाट?
दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने आरोग्य यंत्रणा सतर्क
दिवाळी सणावर कोरोनाचं सावट

दिवाळी सणाच्या उत्साहातच एक चिंता वाढवणारी बातमी आलीय. हिवाळ्यात राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलीए.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता वर्तावण्यात आलीय. त्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग तयारीला लागलाय. राज्यातील सर्व उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयं, आणि सर्व महानगरपालिकांना एक पत्र पाठवून कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याला तोंड देण्याची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. 

जगभरात कोरोनाची दुसरी लाट आलीय. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क, स्पेनमधल्या माद्रिदसारख्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाउन घोषित करण्यात आलाय. युरोपातल्या अनेक देशांमधल्या शाळा आणि कार्यालयं बंद ठेवण्यात आलीएत. इटलीत तर लहान लहान इमारतींमध्येही विलगीकरण कक्ष उभारण्यास सुरूवात झालीय. इस्त्राईल आणि चेक प्रजासत्ताक या देशांनी राष्ट्रीय लॉकडाउन लागू केलाय. तर अनेक देशांनी अंशतः लॉकडाउन, रुग्ण चाचण्या, रुग्णसंपर्कासह अन्य उपाय योजलेत. याशिवाय आधीच्या लॉकडाउनमुळे कमकुवत झालेल्या अर्थव्यवस्था सावरण्याचं आव्हानसुद्धा अनेक देशांसमोर आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय. ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येतही 30 टक्क्यांची घट झालीय. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 89.92 टक्के एवढं झालंय. 

त्यामुळे दिवाळीचा सण उत्साहात साजरा करताना कोरोनाचंही भान ठेवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live