सातारा जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर 144 कलम लागू

Satara
Satara

सातारा : कोरोना Coorna लसीकरण Vaccination केंद्रे Center कोरोना संसर्ग वाढीचा हॉटस्पॉट Hotspot ठरू नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी Collector निर्णय Decision घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व कोरोना लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी होवून परिणामी कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

तसेच नागरिकांमध्ये Citizens आणि नागरिक व लसीकरण केंद्रावर सेवा देणारे कर्मचारी Workers यांचेमध्ये वाद-विवाद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा -

त्यामुळेच सातारा जिल्हयातील सर्व कोरोना लसीकरण केंद्रांच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लागू केल्या आहेत. Section 144 Applies To All Vaccination Centers In Satara District

या आदेशानुसार सर्व कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मास्क परीधान करून रांगेत उभे राहुन प्रत्येक व्यक्ती मध्ये किमान 3 फुटांचे अंतर ठेवत सोशल डिस्टन्सचे Social Distance पालन करणे बंधनकारक राहणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अनावश्यक गर्दीला प्रतिबंध आहे.  

सर्व कोरोना लसीकरण केंद्रांकरता आवश्यक ती ऑनलाईन नोंदणी करून टोकन प्रणालीचा अवलंब करणे आवश्यक राहणार आहे. कोरोना (COVID-19) च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. Section 144 Applies To All Vaccination Centers In Satara District

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही, आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com