ब्रँडेड तेल आणि घाण्याच्या तेलात काय फरक पाहा.

साम टीव्ही
मंगळवार, 16 मार्च 2021

रासायनिक घटकांचा वापर टाळण्यासाठी अनेकजण घाण्याच्या तेलाला प्राधान्य देताना दिसतायत. त्यामुळे, घाण्याच्या तेलाबाबतची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून
 

 

कोरोनाच्या भीतीने अनेकांनी रासायनिक पदार्थ टाळण्याचा संकल्प केलाय. त्यातच आता, तेलाचे दर वाढल्याने घाण्याच्या तेलाकडे लोकांचा कल वाढलाय.मात्र ब्रॅण्डेड तेल आणि घाण्याचं तेल, यात नेमका काय फरक आहे

घाण्याचे तेल 100 टक्के शुद्ध असतं त्याचप्रमाणे, घाण्याच्या तेलात बियांमधील नैसर्गिक घटक कायम राहत असल्यानं शरीराला पोषक घटक मिळतात. घाण्याचं तेल तयार करण्याची प्रक्रिया संथ असल्यानं तेलनिर्मिती दरम्यान तापमान फारसं वाढत नाही, त्यामुळे नैसर्गिक घटक टिकून राहतात. मात्र, घाण्याच्या तेलाची टिकवण क्षमता कमी असते. 

ब्रॅण्डेड तेल तयार करताना तापमान मोठ्या प्रमाणात वाढतं, याच तापमानामुळे नैसर्गिक घटक नष्ट होत असल्याचा दावा केला जातो. ब्रॅण्डेड तेलाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी सायनिक घटकांचा वापर केला जात असल्याचा दावा अनेकजण करतात.

ब्रॅण्डेड तेल आणि घाण्याच्या तेलाच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात फरक असल्याचं दिसून येतं.

 
ब्रॅण्डेड सूर्यफुल तेल 170 रुपये प्रतिलिटर असताना घाण्याचं सूर्यफुल तेल मात्र 490 रुपये प्रतिलिटरने मिळतं. घाण्यातून सूर्यफुल तेल काढताना घट येत असल्याने ते तुलनेने महाग असतं. त्याचप्रमाणे, ब्रॅण्डेड शेंगदाणा तेल 168 ते 170 रुपये प्रतिलिटर असताना घाण्याचं शेंगदाणा तेल 275 रुपये प्रतिलिटरने मिळतं.

तेल ब्रॅण्डेड असो की, घाण्याचं. ते महागलं की सर्वसामान्यांच्या खिशाला करपवून टाकतं आणि त्यांच्या महिन्याच्या बजेटला कात्री लागल्याशिवाय राहात नाही.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live