पाहा, का केले YouTubeने 20,000 व्हिडिओ डिलीट ?

साम टीव्ही
रविवार, 14 मार्च 2021

यूट्यूबर असाल तर सावधान !
यूट्यूबने केले 30 हजार व्हिडओ डिलीट
चुकीची माहिती पसरू नये म्हणून कारवाई

 

 

 

कोरोनाबाबतच्या माहितीचा एखादा व्हिडीओ जर तुम्ही यूट्यूबवर अपलोड करत असाल तर सावध व्हा.कारण चुकीची माहिती प्रसारीत केल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

कोरोनाबाबत आपल्या माध्यमातून चुकीची माहिती पसरू नये यासाठी यूट्यूबने आता पावलं उचलायला सुरूवात केलीय. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून यूट्यूबने नुकतेच 30 हजार व्हिडीओ हटवलेत. 

डिलीट केलेले हे 30 हडार व्हिडीओ गेल्या सहा महिन्यांतील असून कोरोना व्हायरस, लसीकरण, आणि लशींबाबतची चुकीची माहिती दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आलीय. तर फेब्रुवारी 2020 पासून कोरोना साथीविषयी चुकीची माहिती देणारे आतापर्यंत 8 लाखापेक्षा अधिक व्हिडीओ यूट्यूबने डिलीट केलेत. तर ट्विटरनेही कोरोना महामारी तसंच कोरोना लसीविषयी चुकीची माहिती प्रसिद्ध केल्याप्रकरणी आतापर्यंत 1 कोटी 15 लाख खात्यांवर कारवाई करण्यात आलीय.

ही कारवाई करताना यूट्यूबर्सनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. शिवाय कोणताही कन्टेंट अपलोड करण्यापूर्वी त्याविषयीची सत्यता जाणून घेण्याचा सल्लाही जाणाकारांकडून देण्यात येतोय. 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live