सुशांतचा मृतदेह पाहताच रिया "सॉरी बाबू" म्हणाली, सुशांतप्रकरणातील आणखी नवीन खुलासे

साम टीव्ही
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

यावेळी सुशांतचा मृतदेह बघताच रियाच्या तोंडून सॉरी बाबू असे शब्द निघाले. रियाची आई आणि भाऊ सुद्धा सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी जाणार होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली.

सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचलीय. गेले 4 तास सीबीआयची टीम सुशांतच्या घरी तपास करतेय. सीबीआय टीमसोबत नीरज, दीपेश, सिद्धार्थ पिठाणी आहेत. सुशांतच्या आत्महत्येचं नाट्य रुपांतर केलं जातंय. या सर्व घडामोडीनंतर सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी सीबीआयच्या हालचालींना वेग आलाय.

दरम्यान, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यापासून या प्रकरणात नवनवी माहिती समोर येतेय. अशातच रियासोबत शवागृहात जाणाऱ्या एका इसमाने मोठा खुलासा केलाय.

शवागृहात सुशांतचं प्रेत बघून रियाने माफी मागितल्याचं सुरजीत सिंह राठौड़ नावाच्या व्यक्तीने सांगितलंय. सुशांतच्या मृत्यूनंतर १५ जून रोजी सुरजीत रियासोबत शवागृहात गेला होता. यावेळी सुशांतचा मृतदेह बघताच रियाच्या तोंडून सॉरी बाबू असे शब्द निघाले. रियाची आई आणि भाऊ सुद्धा सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी जाणार होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. असंही सुरजीतने सांगितलंय.

सुशांतसिंह आत्महत्याचं गूढ वाढलंय. कारण सुशांत सिंहच्या शेजाऱ्यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. आत्महत्येच्या दिवशी सुशांतच्या घराची लाईट बंद असल्याचा दावा शेजारी राहणाऱ्या एका महिलेने केलाय. त्या दिवशी फक्त सुशांतच्या घराच्या किचनची लाईट सुरू होती. त्यामुळे सुशांतच्या घरात पार्टी झाल्याच्या मित्रांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live