EXCLUSIVE | रस्त्यावर सेल्फी काढणं पडलं महागात

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 21 जानेवारी 2020

सध्या सर्वांनाच नाद लागलाय तो सेल्फीचा...  एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर किंवा एखादी नवी वस्तू घेतल्यावर त्याबरोबर सेल्फी हमखास काढला जातो. मात्र असा सेल्फी काढणं तुम्हाला चांगलंच महागात पडेल. या महिलेलाही नव्या गाडी बरोबरचा सेल्फी असाच महागात पडलाय. त्याचं झालं असं की आपल्या नव्या कोऱ्या गाडीसह एक महिला रस्त्यावरच सेल्फी काढत होती. बराच वेळ हा सेल्फीचा कार्यक्रम सुरू होता. आजूबाजून गाड्याही जात होत्या.

मात्र इतक्यात अचानक एक बाईकस्वार आला आणि त्यानं या सेल्फी काढत असलेल्या महिलेच्या हातून अगदी सहज मोबाईल हिसकावून घेऊन गेला. काय झालं हे या महिलेला समजायच्या आधीच बाईकस्वार गायब झाला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. त्यामुळे हा व्हिडीओ पाहा आणि धडा घ्या... सेल्फीचा मोह आवरा... 

WebTittle: Selfie removal has to be expensive on the road

संबंधित बातम्या

Saam TV Live