कोकणी हापूसच्या नावे कर्नाटकी हापूसची विक्री, आंबा व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक

साम टीव्ही
बुधवार, 17 मार्च 2021

बाजारात हापूसची आवक वाढली
कोकणी हापूसच्या नावे कर्नाटकी हापूसची विक्री
आंबा व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक

आंब्याचा हंगाम सुरू झालाय. एपीएमसीमध्ये 15 हजारांवर हापूसच्या पेट्या रोज दाखल होतायत. आंबा शौकीनांची पहिली पसंती असते ती कोकणचा हापूस. त्यासाठी ग्राहक कितीही पैसे मोजायला तयार असतात. मात्र आंबा व्यापाऱ्यांकडून कोकणच्या हापूस नावाने कर्नाटकी हापूस माथी मारला जातोय.

 हापूसचा सिझन सुरु झालाय. यंदा कोकणात हापूसचं उत्पादन कमी असलं तरी आंब्याची आवक सध्या वाशी मार्केटमध्ये सुरु झालीय.. मात्र व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची सर्रास फसवणूक होताना दिसतेय. कोकणातील हापूसच्या नावाने कर्नाटकचा हापूस ग्राहकांच्या माथी मारला जातोय. आणि कर्नाटकी हापूसमुळे रत्नागिरी हापूसचे दरही कोसळलेत.

कोकणी, कर्नाटकी हापूसचे दर काय?
- रत्नागिरी किंवा देवगड हापूस - 
700 ते 800 रुपये डझन
- कर्नाटकी हापूस - 
70 ते 80 रुपये किलो

 

किमतीमध्ये तफावत असल्यानं कर्नाटकी हापूसच्या तुलनेत रत्नागिरी हापूस गुणवत्तेत अग्रेसर असताना देखील त्याला दर कमी मिळू लागलाय.याचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना बसलाय.तुम्हाला जर कोकणचाच हापूस हवा असेल आणि तुमची फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर हापूस घेताना खबरदारी घेणं गरजेचं आहे

कसा ओळखाल कोकणचा हापूस?

कोकणचा राजा कर्नाटकी हापूस
- कोकणचा हापूस कापल्यावर केशरी असतो - कर्नाटकी हापूस कापल्यावर त्यात पिवळेपणा असतो
 पिवळेपणा नसतो
- कोकणी हापूस आंबा तयार झाल्याववर त्यावर सुरकुत्या पडतात - कर्नाटकी हापूस तयार झाल्यावरही कडक असतो
- साल पातळ असतो - साल जाड असते
- कोकणच्या हापूसचा सुगंध गोड असतो- कर्नाटकी हापूसला एवढा सुगंध नसतो
- वरून दिसायला पिवळा आणि काही वेळा - कर्नाटकी हापूसवर लालसर टिपके असतात
हिरवट असतो 

 रत्नागिरी हापूसची गोडी सर्वांनाच माहीत आहे. या चवीसाठी अनेकजण पैसे मोजतात मात्र हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूस ग्राहकांना दिला जातोय.एकीकडे ग्राहकांची फसवणूक होतेय तर दुसरीकडे शेतक-यांच नुकसान होतंय.त्यामुळे आता पाहूस खरेदी करताना काळजी घ्या.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live