शिवाजी पार्कवरुन सेना-मनसे आमनेसामने

SAAM TV
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

शिवाजी पार्क नुतनीकरण प्रकल्पावरुन शिवसेना मनसे संघर्ष निर्माण झालाय. याला कारणीभूत ठरलंय राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना लिहलेलं पत्र... या पत्रात त्यांनी शिवाजीपार्क नुतनीकरण प्रकल्पासाठी निविदा काढू नये अशी मागणी केलीय. या प्रकल्पासाठी सीएसआर फंडातून निधी आणणार असल्याचं मनसेनं सांगितलंय.

 

शिवाजी पार्क नुतनीकरण प्रकल्पावरुन शिवसेना मनसे संघर्ष निर्माण झालाय. याला कारणीभूत ठरलंय राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना लिहलेलं पत्र. या पत्रात त्यांनी शिवाजीपार्क नुतनीकरण प्रकल्पासाठी निविदा काढू नये अशी मागणी केलीय. या प्रकल्पासाठी सीएसआर फंडातून निधी आणणार असल्याचं मनसेनं सांगितलंय.

आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेवर मनसे डल्ला मारत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. ज्यावेळी मनसेचा नगरसेवक होता त्यावेळी सीएसआर फंडातून शिवाजी पार्कसाठी ४० लाखांचा खर्च का केला नाही असा सवाल शिवसेनेनं विचारलाय

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी पार्कच्या विकास प्रकल्पावरुन शिवसेना-मनेसेत संघर्षाची स्थिती आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल तसा हा संघर्ष अजून पेटण्याची शक्यता आहे.

शिवाजी पार्क प्रकल्प मुद्द्यावरुन शिवसेना-मनसे वाद पेटला

आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील प्रकल्पाला राज ठाकरेंच्या पत्रानं हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय

मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा

शिवाजी पार्क नुतनीकरणाचा प्रकल्प हायजॅक करण्याचा मनसेचा प्रयत्न-- सेनेचा आरोप

याआधीच मनसेचे नगरसेवक असतांना शिवाजी पार्कवर केलेला ४० लाखांचा खर्च सिएसआर फंडातून का केला नाही सेनेचा सवाल...

 आज राज ठाकरेंनी आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र देऊन शिवाजी पार्क प्रकल्पाचा खर्च महापालिकेकडून न करता सिएसआर फंडातून करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केलीय...तसंच, निवीदा प्रक्रीयाही तातडीनं थांबवावी असं सांगितलंय...

मात्र, निवीदेची जाहिरातही आली आता ही प्रक्रीया रद्द होणार नाही असं उत्तर शिवसेनेनं दिलंय

 


संबंधित बातम्या

Saam TV Live