शिवसैनिक आणि कन्नडींमध्ये पुन्हा संघर्ष! आज शिवसैनिक गनिमीकाव्याने बेळगावमध्ये जाणार

साम टीव्ही
गुरुवार, 21 जानेवारी 2021
  • कोल्हापुरातील शिवसैनिक बेळगावमध्ये जाणार
  • शिवसैनिक बेळगावात भगवा ध्वज फडकवणार
  • शिवसैनिक गनिमीकाव्याने बेळगावमध्ये जाणार
  • कन्नडी दडपशाहीच्या विरोधात सेना रस्त्यावर

बेळगावात मराठी भाषिकांनी आयोजित केलेला मोर्चा रद्द झालाय. मात्र कोल्हापुरातील शिवसैनिक बेळगावमध्ये जाऊन त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवणार आहेत. काही दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेचा ध्वज बेळगाव महापालिकेसमोर लावला. याला विरोध करत मराठी भाषिकांनी वेगवेगळे आंदोलन छेडले.

हा ध्वज त्वरित काढून घ्यावा यासाठी आज बेळगावमध्ये मोठा मोर्चा निघणार होता. या मोर्चाला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे तो स्थगित झाला. कोल्हापुरातील शिवसैनिक गनिमीकाव्याने बेळगावमध्ये जाणार आहेत. 

पाहा शिवसैनिक आज नेमकं काय करणार आहेत? -

 


संबंधित बातम्या

Saam TV Live