पत्र पाठविल्याने आरक्षण मिळत नाही, विनायक मेटेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

vinayak mete
vinayak mete

बीड - मराठा समाजाला Maratha आरक्षण Reservation मिळावे याकरिता उचित कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना पत्र लिहले आहे. याच पत्राच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम Shivsangarm पक्षाचे आमदार विनायक मेटे Vinayak Mete यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.  Sending a Letter does not get Reservation - MLA Vinayak Mete 

मेटे म्हणाले की मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पत्र पाठवलं आहे. या मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हे महाविकासआघाडी सरकार, स्वतःच कर्तृत्व बाजूला ठेवून केवळ राजकारण साधण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहेत. तसेच मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार गांभीर्यपूर्वक वागत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. 

हे देखील पहा -

मराठा आऱक्षणबाबत ठाकरे सरकारला कळवळा असेल तर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असा उपरोधिक टोला देखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.  Sending a Letter does not get Reservation - MLA Vinayak Mete

तसेच नव्याने समिती अथवा आयोग नेमून त्या माध्यमातुन मराठा समाजाचा सर्वे करून राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडावी असा सल्ला देखील त्यांनी दिला. तसेच नुसते 'पत्र पाठविल्याने आरक्षण मिळत नाही' असा खोचक सल्लारुपी निशाणा देखील आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे. 

Edited By - Krushna Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com