व्हॉट्सअॅपवरील "चर्चा ग्रुप" मधील संवादामधून अखेर त्या आजींना मिळाला बेड...

A senior citizen from Dombivali got Hospital bed after message gone viral on Whatapp Group
A senior citizen from Dombivali got Hospital bed after message gone viral on Whatapp Group

डोंबिवली : सोशल मिडियावर Social Media अनेक जण टीका करतात. यातून सामाजिक सलोखा बिघडल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र, काही वेळा हाच सोशल मिडिया वरदान ठरल्याचीही उदाहरणे आहेत. व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरल झालेल्या चर्चेतून डोंबिवलीच्या एका ज्येष्ठ महिलेला रुग्णालयात बेड मिळाल्याची सुखद घटना घडली आहे. A senior citizen from Dombivali got Hospital bed after message gone viral on Whatapp Group

डोंबिवली Dombivli मधील देशमुख Deshmukh होम येथे राहणाऱ्या जोहरा बाई शेख या 80 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या नातेवाईक सकाळ पासून डोंबिवलीच्या शास्त्री नगर हॉस्पिटल मध्ये नंबर लावून उभे होते. तिथे कळले की सर्व शासकीय कोविड Covid सेंटर फुल असून प्रायव्हेट हॉस्पिटलला Hospital भरती करावे लागेल. शासकीय लिस्ट प्रमाणे सर्व खाजगी हॉस्पिटला ही फोन करून झाले, पण कोणत्याच हॉस्पिटला बेड Bed शिल्लक नाही असे सांगितले.त्यामुळे त्यांना रुग्ण वाहिकेत ऑक्सिजन लावून ठेवले आहे. 

सदर रुग्णवाहिका आता महापालिकेच्या डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर येथे उभी आहे. मात्र त्यांना अॅडमिट करून घेतले नाही. सामाजिक कार्यकर्ते रोहन मोरे आणि सागर घोणे त्यांना मदत सुद्धा करत होते.A senior citizen from Dombivali got Hospital bed after message gone viral on Whatapp Group

अखेर हीच बाब व्हॉट्सअॅप वरील "चर्चा ग्रुप" मध्ये पडली आणि झालेल्या संवादामधून या आजींना संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बेड मिळाला.आजींना आता ओझोन Ozone हॉस्पिटल येथे अॅडमीट करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना पदाधिकारी संदीप नाईक यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com