साताऱ्यात नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा जेष्ठ नागरिकांना फटका

satara.j
satara.j

सातारा शहरात लस मिळावी या साठी सकाळी लवकर नागरिक रांगा लावून उभे असतात परंतु साताऱ्यातील नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका या सामान्य नागरिकांना वारंवार बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजवाडा परिसरात असणारे कस्तुरबा रुग्णालयात लसीसाठी मोठी रांग सकाळ पासूनच लागली होती परंतु नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे 4 ते 5 तास रांगेत उभे राहिल्या नंतर लस उपलब्ध नसल्याचे जेव्हा नागरिकांना सांगण्यात आले तेव्हा चांगलाच गोंधळ उडाला. (Senior citizens hit by clumsy municipal planning in Satara)  

त्या वेळी नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित बापट आणि नगरसेवक अविनाश कदम यांनी लोकांची समजूत काढत व्यवस्थापनावर ताशेरे ओढल्याने प्रशासन आणि नागरिकांच्यात होणारा संघर्ष टळला.  या रुग्णालयात वशिल्याने काही लोकांना लसीकरण होत असल्याचा नागरिकांचा आरोप होता अखेर टोकन पद्धतीने लसीकरण करण्याच्या सूचना मुख्याधिकारी अभिजित बापट आणि नगरसेवक अविनाश कदम यांनी केल्या नंतर नागरिकांनी सहमती दर्शवली. या रुग्णालयात लस घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याने नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा वारंवार प्रत्यय सातारकर जनतेला येऊ लागला आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारच्या नवीन आदेशानुसार 50 टक्के लसी केंद्र सरकार घेणार आहे. त्याचबरोबर, उर्वरित 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खाजगी रुग्णालयांना मिळणार आहेत. अजूनही लसींचा पुरवठा सुरळीत झाला नसल्याने राज्यातील जेष्ठ नागरिक आणि 18 ते 44 वयोगातील नागरिकांना लस मिळत नाहीये. अशातच काही लोक वशिल्याने लस घेत आहेत. 

Edited By : Pravin Dhamale 

हे देखील पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com