गडकरी राज्यात येणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आज (बुधवार) तेराव्या दिवशीही सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. भाजपने पाच वर्षे आमचाच मुख्यमंत्री राहील असेल म्हटले आहे.
 

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ताकोंडी फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज्यात येणार या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आज (बुधवार) तेराव्या दिवशीही सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. भाजपने पाच वर्षे आमचाच मुख्यमंत्री राहील असेल म्हटले आहे. तर, शिवसेना ही आगोदर ठरल्याप्रमाणे समसमान वाटप व्हावे अशी मागणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना हटविण्याची मागणी होत असताना आता गडकरींच्या नावाचीही चर्चा होत आहे.

 

 

 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या अहमद पटेल यांनी आज गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकलेली नाही. पण, अहमद पटेल यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या एम बाबतही आम्ही बोललो नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण, दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवर संघाने भाजप-शिवसेनेतील वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी गडकरींवर दिली आहे. 

Web Title: Senior Congress leader Ahmed Patel meets Nitin Gadkari at his residence
 


संबंधित बातम्या

Saam TV Live