आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी बातमी! पाहा राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या या चीड आणणाऱ्या घटना

Saam Tv
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

पोलिओ लसीकरणादरम्यान राज्यभरात बालकांना पोलिओ लस देण्यात आली. मात्र, यवतमाळमध्ये १२ बालकांना पोलिओ लस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

यवतमाळमध्ये 12 मुलांना, पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी, आरोग्य विभागातील 3 जणांवर, निलंबनाची कारवाई करण्यात आलीय... हा धक्कादायक प्रकार, कापसी इथं घडलाय. कापसी इथं पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम, भांबोरा पीएससी मार्फत राबवण्यात आला होता...यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, गावातल्या 12 मुलांना पोलिओऐवजी, सॅनिटायझर पाजण्यात आलं...काही तासांनंतर 3 ते 4 मुलांना उलट्या झाल्या...ताबडतोब सर्व मुलांना, यवतमाळ इथं उपचारासाठी, रुग्णालयात दाखल करण्यात आलं...या प्रकरणी, आरोग्य विभागातल्या 3 जणांचं निलंबन केलं असून, एका अंगणवाडी सेविकेच्या कारवाईसाठीचा, प्रस्ताव आयसी डीसी विभागाकडे पाठवला जाणाराय...

 

पाहा यासंदर्भातील महत्वाचा व्हिडिओ -

यवतमाळमधील घटनेची गंभीर दखल आरोग्य मंत्र्यांनी घेतलीय. या प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे महिला आणि बालकल्याण विभागातील महिला कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय.

पोलिओ लसीकरणादम्यान १२ बालकांना पोलिओ डोस समजून चक्क सॅनिटायझर पाजण्यात आल्याची घटना घाटंजी तालुक्‍यातील कापसी (कोपरी) येथे 31 जानेवारीला घडली. लस दिल्यानंतर या सर्व बालकांची प्रकृती बिघडली. यामुळे आरोग्य यंत्रणांची धावाधाव सुरू झाली.  या बालकांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावच्या सरपंचांनी हे डोस तपासल्यानंतर पोलिओ लशीच्या जागी त्यात सॅनिटायझर असल्याचे समोर आले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना लस दिली त्यावेळी लसीकरण केंद्रावर डॉक्टर, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका असे तिघे हजर होते. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. या तिघांच्या निलंबनाचा आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी रुग्णालयाला भेट देऊन या बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच, परिस्थितीचा आढावा घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम काल झाली. घाटंजी तालुक्‍यातील कापसी येथे १२ बालकांना पोलिओचा डोस पाजण्याऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले. ही सर्व बालके १ ते ५ या वयोगटातील आहेत. मुलांना उलट्यांचा त्रास झाल्याने पालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे 31 जानेवारीला रात्रीच १२ बालकांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, पोलिओ लस समजून मुलांना सॅनिटाझर पाजण्यात आल्याचे आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी काही वेळाने सर्व मुलांना पोलिओची लस दिली. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आलेली नव्हती. 

 

 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live