sensexच्या गटांगळ्या, शेअर बाजाराला कोरोनाची लागण

किरण राठोड
सोमवार, 9 मार्च 2020

आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. शेअर बाजार मोठी पडझड झाली आहे. यामुळे व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

मुंबई- आठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्स गडगडलाय. गेल्या आठवड्यापासून सुरु झालेली शेअर बाजारातली घसरण आजही कायम आहे.. कोरोनाचा जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाले आहे. सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीतही घसरण झाली आहे. शेअर बाजाराच्या मोठ्या उलथापालथीमुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. 
 

सोन्याचे दरही वाढणार?

आता सोन्याचे दरही वाढण्याची शक्यता आहे. सोनं प्रतितोळ 50 हजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  शुक्रवारीही 1 हजार 400 अंकांनी सेन्सेक्स कोसळला होता. आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. शेअर बाजार मोठी पडझड झाली आहे. यामुळे व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

 

हेही वाचा - अरे देवा! ऐन लग्नसराईत सोनं प्रतितोळा 50 हजार होणार?

हेही पाहा - YES BANK CRISIS | का बुडाली येस बँक?

 

जीडीपीमधील घसरणीमुळे एकूण बाजारातील व्यवहारांवर मोठा परिणाम झालाय. गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय. अशातच आता सोन्याच्या दरांना प्रतितोळा 45 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. लवकरच हा दर आता 50 हजार झाला, तर सोनं घेणं सर्वसामान्यांना कितपत परवडले, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याआधी सोन्याचे दर 40 हजार रुपयांच्या पार जातील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र 40 हजारच काय आता तर 50 हजार रुपये प्रतितोळा सोन्याचे दर झाले, तर आश्चर्य वाटायला नको.

 

VIDEO | जगावर येतय सगळ्यात मोठं संकट​

 

पेट्रोलचे दर कुठे किती वाढले?

तर सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी स्वस्त झाले आहे.. मुंबईत प्रति लिटर डिझेलचा दर ६६ रुपये.२४ पैसे तर दिल्लीत ६३रुपये.२६ पैसे आहे. मुंबईत प्रति लिटर पेट्रोल ७६.२९ पैसे तर दिल्लीत ७०.५९ पैसे आहे. रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केलंय. त्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.

 

हेही पाहा - INTRESTING | टिकटॉकवरील गावरान व्हायरल जोडप्याची कहाणी पाहिली का?

WEB TITLE- Big drop again as the market opens  sensex drops corona effect on share market finance


संबंधित बातम्या

Saam TV Live