तापमान वाढीचा शेतीवर गंभीर परिणाम ज्वारी, बाजरी, ऊस, कांद्याचं उत्पादन घटणार

साम टीव्ही
बुधवार, 24 मार्च 2021

हवामान बदल,पिकांच्या मुळावर

तापमान वाढीचा शेतीवर गंभीर परिणाम

ज्वारी, बाजरी, ऊस, कांद्याचं उत्पादन घटणार
 

हवामान बदलाचा परिणाम जसा मानवी जीवनावर होतोय, तसाच तो पिकांवरही होतोय.त्यामुळे येत्या काही वर्षात नगदी पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, कुठे गारपीट.तर कुठे असह्य होणारा उन्हाळा असं चित्र आहे हवामानातील हे बदल पिकांच्या मुळावरही उठलेत.त्यामुळे या बदलांचा विपरीत परिणाम होऊन ज्वारी, बाजरी, तसंच ऊस, गहू, आणि तांदूळ या पिकांचं उत्पादन घटणार आहे.

स्विझर्लंडमधील एका मासिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार संपूर्ण महाराष्ट्राच्या तापमानात २०५० पर्यंत ०.५ ते २.५ अंश सेल्सियसची वार्षिक सरासरी वाढ होणं अपेक्षित आहे. २०३३ नंतर तापमानातील ही वाढ प्रकर्षाने होणार आहे. विशेष म्हणजे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तापमानात काही भागांत १ ते २.५ अंश सेल्सिअस इतकी  लक्षणीय वाढ होणार आहे.

हे संशोधन म्हणजे भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटाचा इशारा आहे यातून धडा घेऊन योग्य खबरदारी घेतली गेली नाही तर मानवाच्या अस्तित्वावरच संकट येईल. 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live