अमरावती जिल्ह्यात आज पासून ७ दिवस लॉकडाऊन 

अरुण जोशी
रविवार, 9 मे 2021

जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची होत असेलेली वाढ पाहता जिल्हा प्रशासन आता अधिक सतर्क झाले आज  दुपारी १२ वाजल्यापासून शनिवार १५ मे सकाळी ७ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एक वेळा कडक लॉकडाऊन  लावण्यात आला आहे

अमरावती : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची होत असेलेली वाढ पाहता जिल्हा प्रशासन आता अधिक सतर्क झाले आज  दुपारी १२ वाजल्यापासून शनिवार १५ मे सकाळी ७ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एक वेळा कडक लॉकडाऊन [ संचारबंदी ] लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये केवळ दवाखाने व औषधी दुकान वगळता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुद्धा बंद राहणार आहेत. Seven day lock down in Amravati from Today

शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत फार मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे  कोरोनाचा  पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे व याचा वेग आणखी वाढू नये त्यामुळे लॉकडाऊनचा पर्याय जिल्हा प्रशासनाने निवडला आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह या सुद्धा रस्त्यावर उतरल्या आहेत.  शहरात प्रत्येक चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जो कोणी नागरिक उगाच बाहेर फिरत असेल त्या नागरिकनांवर थेट फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

हे देखिल पहा - 

या सोबतच पेट्रेल पंप सुद्धा सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. रजिस्टार ऑफिस ,किरणा ,भाजीपाला सह सर्व जीवनावश्यक वस्तूची दुकाने, सर्वकृषी सेवा केंद्र ,भाजी मार्केट हे सुद्धा बंद राहणार आहे.

पिंपरीत तीन मुलांचे अपहरण करुन गुप्तांगाला लावला बाम

हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेलमध्ये स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. तिथे ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. Seven day lock down in Amravati from Today

सर्व स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्याचे आदेश आहेत. लग्नामध्ये मिरवणूक, जेवणावळी, वाजंत्री पथक यांना परवानगी नाही. लग्नाला केवळ १५ व्यक्ती उपस्थित राहू शकतील व लग्नसोहळा २ तासांत आटोपणे आवश्यक आहे. बेकायदेशीरपणे लग्नसोहळा पार पडल्यास कारवाई होईल. ग्रामस्तरीय दक्षता समित्यांनी त्याबाबत देखरेख करावी. लग्नसमारंभाचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस ठाण्याची असेल.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live