पाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचीही भारताला धमकी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

इस्लामाबाद : काश्मिरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली. त्यांच्या पाठोपाठ पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही भारताला धमकी दिली आहे.  

आफ्रिदीने इम्रान खान यांच्या वक्तव्याला ट्विट करत पाठिंबा दिला आहे. खान यांनी स्पष्ट संदेश दिला आहे असे मत ट्विटरवरुन व्यक्त केले आहे.

पुलवामामधील हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याच्या भारताच्या आरोपांवर इम्रान खान यांनी आज एक व्हिडिओद्वारे उत्तर दिले. भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने पाकिस्तानवर आरोप ठेवून मते मिळविणे सोपे आहे. मात्र विवेकबुद्धी जागी ठेवून भारत चर्चेचा मार्ग अनुसरेल, अशी आशा इम्रान यांनी करत भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. "काश्‍मीरमधील घटनांना कायम पाकिस्तानला जबाबदार धरले जाते. अफगाणिस्तानमधील वादाप्रमाणे काश्‍मीरचा वादही चर्चेतूनच सोडविला जाऊ शकतो. त्यामुळे या हल्ल्यात पाकिस्तानी नागरिक सहभागी असल्याचा कोणताही सबळ पुरावा भारताकडे असल्यास तो त्यांनी द्यावा, आम्ही निश्‍चितपणे कारवाई करू,' असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

त्यांच्या याच वक्तव्याला आफ्रिदीनेही दुजोरा दिला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडकात पाकिस्तानविरुद्ध सामना खेळी नये असा सूर सर्वत्र पसरत आहे. मात्र, याबाबत बीसीसीआय आणि पीसीबी यांनी अद्याप कोणताही निर्ण घेतलेला नाही. 

Web Title: Shahid Afridi reacts on Imran khans statement on India

संबंधित बातम्या

Saam TV Live