शरद पवार पडद्यामागून काही करत नाही - संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 डिसेंबर 2019

पुणे : शरद पवारांवर विश्वास ठेऊ नये असे काय झाले आहे मला पटवून सांगा. आपल्याच लोकांनी त्यांच्याबद्दल असे पसरवले आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. शरद पवार थेट राजकारण करणारे आहेत. शरद पवार पडद्यामागून काही करत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सत्तेचा रिमोट आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळशी बोलतांना स्पष्ट केले आहे.

राऊत म्हणाले, ''देशाच्या राजकारणाची नस ओळखणारे नेते शरद पवार आहेत. त्यांच्या कामाची पद्धत मला आवडते. शेती, शिक्षण, सहकार याचा त्यांचा अभ्यास आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष समान ताकदीचे आहेत. मग, तिन्ही पक्षांकडे रिमोट पाहिजे. तिन्ही पक्षाचे नेते एकदिलाने काम करत आहेत.'' 

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारचे हिरो ठरलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सकाळ' कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सत्तास्थापनेवेळी घडलेल्या घडामोडींबद्दल ते बोलत होते. 

हे सरकार पाचवर्ष टिकेल. उद्धव ठाकरे याचे नेतृत्व करत आहेत. तिन्ही पक्षांकडून यासाठी प्रयत्न केले जातील. शरद पवारांचे तिघांनाही मार्गदर्शन लाभत राहील. तिन्ही पक्षांना सरकार टिकवणे गरज आहे, असेही राऊत यांनी विश्वासाने म्हटले आहे.

सरकारला बिनपैशाचा तमाशा म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना मी सांगू इच्छितो, की हा पैशांचा तमाशा आहे. पैशांचा तमाशा रोखण्यासाठी आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रससोबत गेलो. त्यांनी कशामुळे पलटी मारली हे मला माहिती नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Web Title: Shivsena MP Sanjay Raut statement about Sharad Pawar and Government
 
संबंधित बातम्या

Saam TV Live