शरद पवारांची प्रकृती उत्तम; सुप्रिया सुळेंनी केला फोटो शेअर    

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

सकाळी खासदार (MP) सुप्रिया सुळे यांनी पवार यांचा वृत्तपत्रांचे वाचन करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. आणि त्या फोटोत पवार अत्यंत प्रसन्न असल्याचे दिसत आहे

बारामती: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना  पोटात अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर काल शस्त्रक्रीया करण्यात आली. पवार यांच्यावर काल झालेल्या शस्त्रक्रियेनंतर आज त्यांची प्रकृती आता एकदम उत्तम असल्याचे सांगत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी पवार यांचा फोटो पोस्ट केला आहे. Sharad Pawar is in good health Supriya Sule shared a photo

सकाळी खासदार (MP) सुप्रिया सुळे यांनी पवार यांचा वृत्तपत्रांचे वाचन करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. आणि त्या फोटोत पवार अत्यंत प्रसन्न (Happy) असल्याचे दिसत आहे. 

पवार यांची तब्येत अचानकच बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीमध्ये  लवकर सुधार व्हावा यासाठी रात्री तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. 

दरम्यान काल रात्री ब्रीच कँडी (Breach candy) रुग्णालयात असताना सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचेही छायाचित्र त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.  महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री (Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही काल माध्यमांमार्फत पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली होती. Sharad Pawar is in good health Supriya Sule shared a photo

त्या नंतर लोकांची काळजी कमी करण्यासाठी  सुप्रिया सुळे या वेळोवेळी पवार यांच्या तब्येतीबाबत सोशल मिडियावर उपडेट करत होत्या. काल रात्री सुळे यांनी रुग्णालयातील डाॅक्टरांचे त्यांचे मनापासून आभार मानले. पवार यांची तब्येत आता छान असल्याचे सांगत सुळे यांनी आज पवार यांचा फोटो पोस्ट करत अनेक लोकांची काळजी कमी केली आहे.

दरम्यान पवार यांना रुग्णालयात हलविल्याची बातमी समजताच अनेकांना त्यांच्या तब्येतीबद्द्दल जाणून घेण्याची उत्कंठा लागली होती. पित्ताशयातील खड्यांमुळे (Gallstones) त्यांना त्रास होत असल्याचे सुप्रिया सुळेनी नमूद केले होते. आज पवार यांचे ताजे छायाचित्र पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

Edited by-Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live