शरद पवार यांच्या मार्फत सोलापूरकरांना रेमडिसिवीरची मदत 

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

सोलापूर मध्ये गरजू व गरीब कोरोनाबाधित रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ७५ रेमडीसीवीर इंजेक्शन्स पाठवून दिली आहेत

सोलापूर: सोलापूर Solapur मध्ये गरजू व गरीब कोरोनाबाधित Corona रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी ७५ रेमडीसीवीर इंजेक्शन्स पाठवून दिली आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष महेश गादेकर यांनी ही दिली आहे.  Sharad Pawar help to Solapur by supplying remdesivir injection

आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर आणि माजी नगरसेवक दीपक राजगे यांच्याकडे ही इंजेक्शन सुपूर्द केली आहेत. 

सोलापूरमध्ये सध्या रेमडिसिवीर Remedesivir इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. रेमडिसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी गरीबांना रात्रं -दिवस पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सोलापूरसाठी ७५ रेमडिसिवीर इंजेक्शन पाठवून दिली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या फंडाच्या माध्यमातून हे इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. सोलापूर शहरामधील गरीब आणि गरजू नागरीकांना ही इंजेक्शन्स देण्यात येणार आहेत.

सध्या सोलापुरात रेमडीसीविर इंजेक्शन्सच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर Milind Shambharkar यांनी समिती स्थापन केली आहे. त्या समितीकडे ही इंजेक्शन्स देण्यात येणार असल्याची माहिती महेश गादेकर यांनी दिली आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी शरद पवार यांनी सोलापूरकरांसाठी ८० रेमडिसिवीर इंजेक्शन पाठवून दिली होती.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live