VIDEO | शरद पवारांनी उडवली रामदास आठवलेंची खिल्ली, म्हणाले...

साम टीव्ही
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

रामदास आठवलेंच्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं सभागृहात किंवा सभागृहाबाहेर फारसं कोणी मनावर घेत नाही, असा टोला शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लगावलाय. काल रामदास आठवलेंनी शरद पवारांना NDA मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. आठवलेंच्या या निमंत्रणाची पवारांनी खिल्ली उडवलीय.

याशिवाय मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात उदयनराजे आणि संभाजी महाराजांनी एकमताने विचार करून हा प्रश्न सोडवला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कारण हे दोघेही जण भाजप कोट्यातून राज्यसभेवर गेलेत. त्यामुळे त्यांनीच केंद्र सरकारवर दबाव आणून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा असंही पवारांनी म्हटलंय. 

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या

Saam TV Live