शरद पवारांनी निमंत्रण दिले पण; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येण्याचे टाळले..

गणेश कोरे
मंगळवार, 28 जानेवारी 2020


विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट गाजली होती. संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने हे दोन नेते भेटले होते. साखर परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र या परिषदेला मोदी येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पुणे - वसंतदादा साखऱ संस्थेतील आंतरराष्ट्रीय साखऱ परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान शाश्‍वतपणा - साखर व तत्संबंधित उद्योगात वैविध्यपणा आणि नाविन्यपूर्णता या विषयावर दुसऱ्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. परिषदेचे उद्घाघाटन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याहस्ते शुक्रवारी (ता.३१) होणार असून, प्रमुख मार्गदर्शन आंतराष्ट्रीय साखऱ संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस आॅरिव्ह यांचे होणार आहे.

शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या संस्थेचे निमंत्रण मोदींनी नाकारले, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. याच संस्थेच्या एका कार्यक्रमात पुण्यात मोदी यांनी आपण शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याचे विधान केले होते. त्यावरून बरीच चर्चा झाली होती.

 

 

 

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात  सरकार स्थापनेचे नाट्य सुरु असताना ज्येष्ठ नेते व माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या निमंत्रणाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सुमारे ४५ मिनीटे चर्चा केली होती. या भेटी मागे अनेक राजकीय अर्थ काढण्यात आले होते. मात्र श्री. पवार यांनी साखर परिषदेच्या निमित्ताने भेट झाल्याचे तेव्हा स्पष्ट केले होते.

राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर पवार यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मोदींशी तेव्हा झालेल्या राजकीय चर्चेचा तपशील सांगितला होता. त्यानुसार मोदी यांनी राष्ट्रवादीने सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे पवार यांनी सांगितले.

मात्र आता या आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि प्रदर्शनीचे उद्धाटन पवार यांच्या हस्तेच होणार असल्याचे संस्थेने स्पष्ट झाले आहे. या परिषदेला विविध देशातील साखर आणि ऊस तज्ञ उपस्थित राहणार आहेत. मात्र परिषदेच्या उद्घघाटनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कृषीमंत्री दादा भुसे यांचे नाव नाही. निमंत्रण पत्रिकेमध्ये महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या साखऱ उद्योगाशी निगडीत बहुतांश मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख आहे. यामध्ये अजित पवार, अशोक चव्हाण, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे. हसन मुश्रीफ, अमित देशमुख, बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या एकमेव शंकरराव गडाख यांचे नाव पत्रिकेत आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live