शेतकरी आंदोलनात शरद पवारांचा मोदी सरकारसह राज्यपालांवर घणाघात, म्हणे असे राज्यपाल कधी पाहिले नाहीत...

साम टीव्ही
सोमवार, 25 जानेवारी 2021

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. कृषी कायदे करताना केंद्र सरकारनं घटनेचा अपमान केल्याचा गंभीर आरोप पवारांनी केलाय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. कृषी कायदे करताना केंद्र सरकारनं घटनेचा अपमान केल्याचा गंभीर आरोप पवारांनी केलाय. तर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राज्यपालांना वेळ नसल्याची टीकाही पवारांनी केलीय. मुंबईतल्या आझाद मैदानात किसान सभेनं एल्गार पुकारलाय. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी एकवटले. त्यावेळी पवारांनी केंद्रावर आरोप केलाय.

पाहा शरद पवारांचा हा संपूर्ण व्हिडिओ -

 

मोदी सरकारवर टीकेचे ताशेरे

मोदी सरकारवर बोलताना शरद पवारांनी चांगलेच टीकेचे ताशेरे ओढलेत. सरकारला शेतकऱ्यांविषयी जराही आस्था वाटत नाही, आणि अशा या सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करायलाच हवा असं म्हणत पवारांनी मोदी सरकारवर घणाघात केलाय. दरम्यान, पंजाबचा शेतकरी काय पाकिस्तानी आहे का? असाही सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय. सरकारनं त्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी असल्यासारखी वागणूक दिली आहे. चर्चा न करता कृषी कायदा करण्यात आला आणि हा घटनेचा अपमान असल्याचंही पवार यावेळी म्हणाले. 

हेही वाचा-

 

शेतकरी हक्कासाठी किसान सभेचा एल्गार, आज राजभवनावर धडकणार मोर्चा

"महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल पाहिले नाहीत"

आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचे राज्यपाल कधीही पाहिले नाहीत. लाखोंच्या संख्येनं लोक त्यांना भेटायला येऊन निवेदन देणार असं माहित असताना राज्यपाल गोव्याला गेलेत. त्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे मात्र शेतकऱ्याला नाही. असं म्हणत शरद पवारांनी राज्यपालांची खिल्ली उडवलीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live