राज ठाकरे निवडणूक लढविणार की नाही माहिती नाही : शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

सोलापूर : सत्ताधारी भाजप-शिवसेनेची ताकद वाढली असली तरी यंदाची विधानसभा निवडणूक एकतर्फी होईल असे वाटत नाही. राज ठाकरे निवडणूक लढविणार की नाही माहिती नाही. सत्तेशिवाय जे राहू शकत नाहीत, असे पक्ष सोडून गेले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी राज्य दौऱ्याची सुरवात सोलापुरातून केली आहे. पक्ष सोडून गेलेल्यांचा विचार न करण्याचा सल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. उस्मानाबाद दौऱ्यावर जाण्यापूर्वी शरद पवार यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे देत राष्ट्रवादी आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले.

शरद पवार म्हणाले, की तरुण पिढीमध्ये परिवर्तनाची भावना आहे. लीडरशीप तयार करणे ही नेतृत्वाची गरज आहे. अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी विरोधकांची मदत गरजेची आहे. आक्रमक भाष्य केले की लोकांना आता आवडते. विधीमंडळात धनंजय मुंडे आक्रमक पद्धतीने आपले मुद्दे मांडतात. काँग्रेसशी याबाबत चर्चा झाली होती. यंदा एकतर्फी निवडणूक होईल असे वाटत नाही. नागरिक विरोधकांना चांगले बहुमत देतील असे मला वाटते. राज ठाकरे निवडणूक लढविणार की नाही हे मला माहिती नाही. ईव्हीएमबद्दल मी अद्यापही साशंक आहे.

Web Title: Sharad Pawar statement on assembly election and Raj Thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live