मोठा फटका! सेन्सेक्सच्या तब्बल 1 हजार 300 अंकांनी गटांगळ्या

Share Market
Share Market

मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प आज येणार आहे. मात्र त्याआधी शेअर बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शेअर मार्केटवर आज पुन्हा एकदा कोरोना इफेक्ट दिसून आलाय. शेअर बाजार 1300 अंकानी घसरलाय. तर निफ्टीही 450 अंकांनी कोसळलाय. दुसरीकडे सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. सोन्याने 44 हजार रुपयांचा टप्पा ओलांडलाय. तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयांचं मूल्यही घसरलंय. या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली होती. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांची मोठी निराशा झाली आहे. 

2 फेब्रुवारीला आठवड्याची जेव्हा सुरुवात झाली होती, तेव्हा सेन्सेक्सने उत्साहात सुरुवात केली होती. गुंतवणूकदारांमधील मरगळही या उत्साहाने दूर केली होती. आर्थिक नुकसान भरुन निघेल या आशेत असणाऱ्या गुंतवणूकदारांना आठवड्याच्या शेवटच्या दिवसाने मात्र निराशा हाती आणली आहे. तब्बल 1 हजारहून अधिक अंकानी सेन्सेक्सने गंटागळ्या खाल्या आहेत. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये पसली आहे. 

मागच्या संपूर्ण आठवड्यात कोरोना इफेक्ट शेअर बाजारावर बसला होता. लाखो रुपयांचं नुकसानही या परिणामामुळे झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. दरम्यान आता पुन्हा एकदा शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी धास्ती घेतली आहे. जो पर्यंत कोरोनााचा प्रभाव कमी होत नाही, तोपर्यंत संपूर्ण जागतिक बाजारपेठेतील उलथापालथही थांबणार नसल्याची भीती व्यक्त केली जातेय. शेअर बाजारातही कोरोनाचा परिणाम असाच कायम राहिल्या मोठं नुकसान होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना खबरदारी घेण्याचं मोठं आव्हान सध्या व्यावसायिकांसोबतच गुंतवणूकदारांपुढे उभं ठाकलंय. 

corona effect on share market sensex niffty loss finance mumbai doller digit budget 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com