WhatsApp वरून पॉर्न व्हिडिओ पाठवत असाल तर ही शिक्षा होईल.....

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नवी दिल्लीः सोशल नेटवर्किंगवर माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या WhatsApp वरून चाईल्ड पॉर्न व्हिडिओ पाठवले आणि त्याविरोधात एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यास व्हॉट्सऍप अकाऊंट बंद करण्याबरोबरच सात वर्षे कारागृहाची हवा खावी लागणार आहे.

नवी दिल्लीः सोशल नेटवर्किंगवर माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या WhatsApp वरून चाईल्ड पॉर्न व्हिडिओ पाठवले आणि त्याविरोधात एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यास व्हॉट्सऍप अकाऊंट बंद करण्याबरोबरच सात वर्षे कारागृहाची हवा खावी लागणार आहे.

व्हॉट्सअॅप कंपनीच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 'चाईल्ड पोर्नोग्राफी ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. व्हॉट्सअॅपवरून अनेक जण एकमेकांना चाईल्ड पॉर्न व्हिडिओ पाठवत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा एक गुन्हा असून, या गुन्ह्याचा तपास करण्यात येईल. चाईल्ड पॉर्न व्हिडिओ पाठविणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्यात येतील. पोर्नोग्राफीसाठी व्हॉट्सअॅपवर आजिबात जागा नाही. कुणी याविरोधात तक्रार केल्यास व्हिडिओ पाठवणाऱ्यांचे अकाउंट व्हॉट्सअॅप बंद करण्यात येईल.'

दरम्यान, व्हॉट्सऍप नेटिझन्सची गरज ओळखून सतत बदल करत आहे. बदल ओळखून व्हॉट्सअॅपने आयफोन युजर्संना ग्रुप व्हिडिओ कॉलसाठी एक नवीन बटन दिले आहे. या फीचरला लेटेस्ट स्टेबल व्हर्जन 2.18.380 अंतर्गत रोलआउट करण्यात येते. यावेळी व्हॉट्सअॅप कंपनी अँड्रॉयड यूजर्सना सुद्धा एक नवीन फीचर देण्याच्या तयारीत आहे. या नवीन फीचर्समुळे युजर्सना चॅट विंडोमध्ये स्क्रॉलिंग करताना व्हिडिओ पाहता येणार आहेत. सध्या हे अपडेट यूट्युब, फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामवर उपलब्ध करण्यात आले आहे. यूजर्सकडून पाठवलेली लिंक रिसिव्ह केल्यानंतर ती अॅक्टिव्ह होईल. लिंकवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ तात्काळ सुरू होईल. त्यामुळे युजर्संना चॅट सोडण्याची गरज नाही.

Web Title: Sharing child pornography on WhatsApp then whatsaap acount close


संबंधित बातम्या

Saam TV Live